शबनम न्यूज , प्रतिनिधी : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक राजेश सस्ते व सौ अर्चनाताई राजेश सस्ते यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग व पिंपरी चिंचवड नवीन भोसरी रुग्णालय झोन मोशी दवाखाना यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर दिनांक १७ सप्टेंबर, बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत, अभंग क्लिनिक समोर,डिव्हाईन डीड्स सोसायटी पार्किंग शिवाजी वाडी, मोशी येथील संपन्न होत आहे.
या महाआरोग्य शिबिरामध्ये स्त्री रोग तपासणी, नेत्र तपासणी, बालरोग तपासणी, नाक कान घसा तपासणी, दंतरोग तपासणी, मानसोपचार तपासणी,, किशोरवयीन मार्गदर्शन, छातीचा एक्स-रे, गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण सर्व प्रकारच्या रक्त तपासणी , थुंकी तपासणी, आभा व आयुष्यमान कार्ड तसेच सर्व प्रकारचे औषध वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राध्यापक राजेश सस्ते व सौ. अर्चनाताई राजेश सस्ते यांनी केले आहे.