शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणेशोत्सवानंतर नागरिकांना आता नवरात्री उत्सवाचे वेध लागले आहेत. घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे नवरात्री अवघ्या आता अवघ्या आठ ते नऊ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने मूर्तीकारांच्या कामांना देखील वेग आला आहे. वाघावर आरुढ देवी मातेच्या सुंदर मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यांना आकर्षक रंग व फायनल टच देण्यात येत आहे.
बाजारपेठेत देखील नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीमध्ये महिला वेगवेगळ्या नऊ रंगाचे वस्त्र परिधान करत असल्याने नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार आकर्षक साड्या व इतर वस्त्रे कपड्यांच्या दुकानांमध्ये सजू लागली आहेत. तसेच पुरुषांसाठी वेगवेगळे आकर्षक पारंपारिक कपडे देखील कपड्याच्या दुकानांच्या डिसल्पेमध्ये दिसत आहेत. नवरात्रीसाठी शहरात ठिकठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले असून त्याचीही तयारी सुरू आहे.