spot_img
spot_img
spot_img

लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाबाबत बैठकांचे सत्र सुरू – प्रकल्प सुरू करण्याबाबत वेगवान हालचाली

मावळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार – आमदार सुनील शेळके

पुणे- मावळ तालुक्यातील पर्यटनाला नवी ओळख देणारा आणि स्थानिक विकासाला गती देणारा लोणावळा स्काय वॉक प्रकल्प आता वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष चर्चा पार पडली.
उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्यासोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर झालेल्या या बैठकीत प्रत्यक्ष जागेचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. विकास आराखड्यातील जागांची पडताळणी, पर्यायी कनेक्टिव्हिटी रस्त्यांची आखणी, तसेच पर्यटनवाढीद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर ठोस उपाययोजना ठरविण्यात आल्या. बैठकीत पर्यटनक्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणी, स्थानिक उद्योजक व तरुणांना प्रोत्साहन आणि शाश्वत विकासासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी रोजगार, व्यवसाय व उद्योगधंद्यांचे नवे दालन खुले होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे मावळ तालुक्याला पर्यटननकाशावर आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे पवना धरण परिसरासह मावळातील गावांचा विकास वेगाने होईल आणि पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास मावळ तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!