spot_img
spot_img
spot_img

सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली.

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे. उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!