शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर प्रभाग क्र. २८ रहाटणी येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर मध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक लोकउपयोगी प्रकल्प राबविले आहेत सुसज्य रस्ते, उद्यान, क्रीडांगणे, शिल्प व इतर प्रकल्प साकारण्यात आले असून, त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोड हा अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येत असून रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे, या कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक परिसरात येथे लहान मोठ्या खाजगी शाळा आहेत, अनेक सोसायट्या देखील या रोडवर आहेत नागरिक देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात, वाहतुकीचे पालन व्यवस्थित होईल या दृष्टीने, चौक सुशोभीकरण अंतर्गत पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप असणारे शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.