शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे मॅनेजमेंट सेलचे शहराध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांच्या मातोश्री सकीना रशीद मुल्ला (वय ६७) यांचे शुक्रवार (दि. १२) सप्टेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी २ वाजता लिंक रोड, कब्रस्तान भाट नगर येथे करण्यात आला.
अकबर भाई मुल्ला राष्ट्रवादी पक्षाचे मॅनेजमेंट सेलचे शहराध्यक्ष असून ते संविधान सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत.