spot_img
spot_img
spot_img

रिव्हर रेसिडेन्सीतील नागरिकांना दिलासा; समस्या सोडवण्याचे आश्वासन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीला युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिश आनंदराव बारणे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या भेटीत सोसायटीतील नागरिकांनी दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक गंभीर समस्या मांडल्या. त्यामध्ये पाणीपुरवठ्यातील अनियमितता, परिसरातील स्वच्छतेचा अभाव, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक सुविधांची कमतरता तसेच सुरक्षिततेशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले.

नागरिकांच्या या समस्या शांतपणे ऐकून घेत  बारणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रिव्हर रेसिडेन्सीतील प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या समस्या केवळ ऐकण्यासाठी नाही, तर त्यांचे ठोस निराकरण करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्राधान्याने तातडीची पावले उचलली जातील.”

यावेळी उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या अपेक्षा आणि गरजा स्पष्ट केल्या. बारणे यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत, शासनस्तरावर तसेच प्रशासनामार्फत पाठपुरावा करून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास दिला.

“आम्ही फक्त आश्वासन देत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवून आणण्यावर आमचा भर आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि प्रभागाचा विकास व्हावा, हीच आमची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.

स्थानिक नागरिकांनी या आश्वासनाचे स्वागत करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

“आमच्या समस्या समजून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची तयारी दाखविल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. या भेटीमुळे आमच्यात विश्वास आणि दिलासा निर्माण झाला आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

रिव्हर रेसिडेन्सीतील या भेटीद्वारे आतिश बारणे यांनी केवळ नागरिकांचा विश्वास जिंकला नाही, तर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारा जबाबदार लोकनेता म्हणून स्वतःची ओळख अधिक ठळक केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!