शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रीय रायफल प्रशिक्षण केंद्रात अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा कृष्णा नगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडांगणा जवळील पिंपरी चिंचवड राष्ट्रीय रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात पार पडली.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील १०० हून अधिक अभियंत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि खेळ स्पिरिट जपत करण्यात आले. स्पर्धेअंतर्गत विविध गटांमध्ये विजेत्यांची निवड करण्यात आली असून, सर्व सहभागी अभियंत्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे.