आतिष बारणे यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले कृत्रिम तलाव अनेक गणेश भक्तांसाठी सोयीचे
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणेशोत्सव नुकतेच संपन्न झाले. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आतिष आनंदराव बारणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जना करीता कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. या कृत्रिम तलावाचा अनेक गणेश मंडळ तसेच अनेक छोटे-मोठे गणेश मंडळ व घरगुती गणपती विसर्जनासाठी या कृत्रिम तालावाचा उपयोग करण्यात आला. यामध्ये 3800 गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.
आतिष आनंदराव बारणे यांच्या वतीने मोशी परिसरात हॉटेल पकवान जवळ, बारणे वस्ती येथे सदर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी अनेक गणेश मंडळांना या कृत्रिम तलावाचा उपयोग करता येतो. यावर्षीही अनेक गणेश मंडळांनी याचा लाभ घेतला. शेकडोच्या संख्येने गर्दी येथे पहावयास मिळाली.