शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी यांच्या सहकार्याने दिनांक ९/९/२०२५ रोजी जिल्हास्तर १७ वर्षे मुलांच्या शालेय स्पर्धेने ंव्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मा. क्रीडा उपायुक्त श्री पंकज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .या प्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे विद्यालयाचे प्राचार्य बाळकृष्ण धुमाळ,केंद्रप्रमुख श्री मनोज देवळेकर, क्रीडा पर्यवेक्षक श्री बन्सी आटवे , श्री सुभाष जावीर,श्री वाल्मिकी पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ९/९/२०२५ ते १२/९/२०२५दरम्यान संपन्न होणाऱ्या या स्पर्धेमध्ये खाजगी आणि मनपा अशा एकूण २९० विद्यालयांनी भाग घेतला असून एकूण ३५०४ विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत.
सदर स्पर्धेचे कामकाज विशाल होले, शिंदे, सुरेश मंजाळ, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल पारखे, धनंजय झिंजुर्डे, खेमराज ठकुरानी, गणेश भोसले पाहिले.
स्पर्धेचा निकाल –
- ज्ञान प्रबोधिनी विद्यालय निगडी प्रथम क्रमांक
- श्री वाघेश्वर विद्यालय चऱ्होली द्वितीय क्रमांक
- रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी तृतीय क्रमांक