spot_img
spot_img
spot_img

शिवशाही मित्र मंडळ प्राधिकरणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न

प्राधिकरण : शिवशाही मित्र मंडळ प्राधिकरणामध्ये मागील २९ वर्षांपासून सलगपणे आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची गौरवशाली परंपरा आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव अतिशय भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

संपूर्ण उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम, आरत्या, भजन, महाप्रसाद तसेच, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गणपती बाप्पाच्या मूर्तीची आकर्षक सजावट आणि मंडपातील भक्तिमय सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करत सर्व कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पाडले. गणेश विसर्जन मिरवणूकही पारंपरिक वाद्यांच्या गजरात, पर्यावरणपूरक संदेश देत उत्साहात संपन्न झाले!

या वर्षीही आपल्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला असल्याचे नागरिकांनी नमूद केले. मंडळाने सर्व नागरिकांचे आभार मानले आणि पुढील वर्षीही अधिक उत्साहात साजरा करूया.

 

भव्य बक्षीस समारंभ २०२५ उत्साहात पार पडला.या समारंभात विविध स्पर्धांचे विजेते मंडळाच्या वतीने गौरवण्यात आले.उपस्थित मान्यवर व मंडळातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

ह्या वर्षी प्रथमच मुला-मुलींसाठी विज्ञान प्रकल्प स्पर्धा आयोजित केली गेली सर्वांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला!

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!