शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे ची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष ऍड. अभय छाजेड हे होते. यावेळी उपाध्यक्ष डॉ. बाबुराव गायकवाड आणि सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक देसाई तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सभेची सुरुवात दीप प्रज्वालाने झाली, त्यानंतर वार्षिक अहवाल सादर करताना अध्यक्षांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली. बँकेच्या एकूण ठेवी 7937.77 लाख तर कर्ज वाटप रुपये 4380.04 लाख झाले असून, निव्वळ एनपीए 1.99% एवढा आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेस रुपये 46.43 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. सदर सभेमध्ये भागधारकांसाठी पाच टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेच्या शेवटी उपाध्यक्ष डॉ.बाबुराव गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व मान्यवर ,अधिकारी व भागधारकांच्या उस्फूर्त सहभागामुळे सभा आनंददायी वातावरणात संपन्न झाली.