पिंपरी चिंचवड शहरातील एस आर ए प्रकल्प अंतर्गत पत्रा शेड येथील सॅनेटरी चाळ या एस आर ए
प्रकल्पाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी दिनेश रोकडे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात कामगार नेते सुंदर कांबळे यांनी सदनिका धारकांना मार्गदर्शन केले. सदर प्रकल्पाबाबत माहिती दिली.या निमित्ताने अनेक कुटुंबांना आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. ज्याचा मोठ्या प्रमाणात आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी संविधान महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता सुंदर कांबळे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या संख्येने सदनिका धारक नागरिक उपस्थित होते.