पिंपरी – चिंचवड : रिक्षा चालक आणि प्रवाशी यांचं नात घट्ट असलं तरी अनेकदा खटके उडतात. सर्वमान्य नागरिकांना तर अनेक रिक्षा चालकाचे वाईट अनुभव आहेत. अस असलं तरी आज ही काही प्रामाणिक रिक्षा चालक बघायला मिळतात. सांगवीमध्ये प्रवासादरम्यान रिक्षात राहिलेली एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी प्रामाणिक रिक्षा चालकाने प्रवाशाला परत केली आहे.श्रेयस पुरोहित हे आज रवींद्र देवकुळे यांच्या रिक्षातून सांगवी ते बावधन असा प्रवास करत होते. त्यांचं इच्छित स्थळ आल्यानंतर ते रिक्षातून उतरले. परंतु, याच घाईत त्यांची एक तोळे सोन्याची अंगठी हरवली. हे काही वेळाने लक्षात आले. त्यांनी अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने ऑनलाइन रिक्षा बुक केल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी रिक्षा चालकाला फोन करून याबाबत विचारणा केली. रिक्षा चालक रवींद्र देवकुळे यांनी रिक्षात शोधाशोध केल्यानंतर ती अंगठी सापडली.