शबनम न्यूज | प्रतिनिधी
थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव,शेखर गोरगले,प्रशांत माकर,केतन चव्हाण,अजय तटले,आशा तटले,कल्पना माकर,अनिता शितकले,शाहूराज चव्हाण,प्रतिक माकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.
‘राजे उमाजी नाईक हे इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे थोर क्रांतिकारक मानले जातात. त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीमुळे लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत अधिकच प्रज्वलीत झाली .राजे उमाजी नाईक यांच्या प्रखर देशभक्तीची प्रेरणा घेऊन अनेकांनी पुढे स्वतः स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला, असे अण्णा बोदडे म्हणाले.