spot_img
spot_img
spot_img

धूत कुटुंबियांनी साकारली साडे सहा फूट शिव मूर्ती

बावधन येथील श्वेता आशिष धूत यांनी कोईमतूर येथील आदीयोगींची प्रतिकृती शिवमूर्ती आपल्या घरात बनवली आहे.
प्रत्येक महाशिवरात्रीला जेव्हा धूत कुटुंब ईशाच्या (कोईमतूर) पवित्र ठिकाणी जाते , तेव्हा (शिव मूर्ती ) आदियोगींच्या भव्य खूपच सृजनशीलतेची प्रेरणा मिळते. त्या योगींच्या दिव्य उर्जेने प्रेरित होऊन आणि धूत कुटुंबाने थर्माकोलपासून ६.५ फूट उंचीचा सुंदर आदियोगींची मूर्ती साकारली आहे. खूप मेहनत घेऊन आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन हि प्रतिकृती साकारली, जी भक्तीभाव आणि कलेचे सुंदर मिश्रण आहे.

हा देखणा पुतळा आता गणपती बाप्पाच्या मागे उभा असून, त्यातून भक्ती, सौंदर्य आणि अध्यात्मिक उर्जा प्रकट होते. दिव्यांच्या मंद प्रकाशात हा पुतळा जणू जिवंत झाल्यासारखा भासतो आणि त्यातून एक वेगळीच ऊर्जा जाणवते.

श्वेता धूत म्हणाल्या कि, जेव्हा आदियोगींच्या पुतळ्याचा चेहरा बारकाईने घडवत होते, तेव्हा मनात वेगळ्याच भावना जागृत झाल्या. चेहऱ्याच्या रेषा आकार घेऊ लागल्या तेव्हा अंगावर रोमांच उठले. जणू त्या पुतळ्याच्या शांत स्मितामुळे आजूबाजूला आनंद आणि शांतता पसरत होती. चेहऱ्याच्या हलक्या वळणांमधून जणू काही शब्दांविना आत्म्याशी बोलणारा संदेश मिळत होता. त्या क्षणी कला आणि अध्यात्म एकत्र येऊन अशी निर्मिती झाली जी शांती आणि आनंदाचा प्रकाश पसरवत होती.

ही निर्मिती माझ्या कुटुंबाच्या सृजनशीलतेची, आध्यात्मिक जोडणीची आणि कलेवरील प्रेमाची खरी साक्ष देणारी आहे.

श्वेता आशिष धुत,पाटील नगर, बावधान

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!