शबनम न्यूज | प्रतिनिधी
राजमुद्रा प्रतिष्ठान मंडळामध्ये, प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल, सोनवणे वस्ती, चिखली यांचे विशेष उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठण केले.
या पठणामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. या वेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय जरे उपस्थित होते. शालेय उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि अध्यात्मिक जडणघडण व्हावी, यासाठी हे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.