पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक भोसरीचे माजी चेअरमन प्राध्यापक राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या दहाव्या दिवशी अनेक गणेश मंडळांना,सोसायटी धारकांना भेटी दिल्या व गणरायाची आरती केली. या मध्ये ऑर्बिटविला सोसायटी शिवाजीवाडी,रवीतेज सोसायटी डुडुळगाव,शमा व्हिजन सोसायटी मोशी,स्टेला सोसायटी डुडुळगाव फ्लॉवर सिटी सोसायटी इंद्रायणी पार्क, या ठिकाणी प्रा. राजेश सस्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच साई ऑप्टिकल्स च्या उदघाटन प्रसंगी प्रा. राजेश सस्ते यांनी उपस्थित राहून व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या,त्याच बरोबर महारुद्र ग्राफिक्स अँड फ्लेक्स प्रिंटिंग च्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व ठिकणी प्रा. राजेश सस्ते यांनी आरती व महापूजेनिमित्त भेटी दिल्या . त्यांचे सर्वत्र स्वागत व सन्मान करण्यात आले.