spot_img
spot_img
spot_img

मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत मधुरा गोंधळेकर आणि सुप्रिया धोंगडे मानकरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेत २३ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा गोंधळेकर व ४१ ते ५५ वर्षे वयोगटात सुप्रिया धोंगडे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. २३ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा कोष्टी आणि स्नेहा कोठारी आणि ४१ ते ५५ वर्षे वयोगटात पूनम कौर आदर्श आणि सुवर्णा येवलेकर यांनी त्यांच्या गटात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सुमेधा भोसले, ईशा हुबळीकर, सारिका सेठ आणि अभिनेते अभ्यंग कुवळेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात अर्चना सपकाळ यांच्या गणेश वंदनाने झाली.

मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य, व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेसेटिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड आणि अभिनेते अभ्यंग कुवळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि अभिनेते अभ्यंग कुवळेकर यांनी विजेत्या महिलांना मुकुट प्रदान केले. याप्रसंगी मोहन टिल्लू, अतुल गोंजारी आणि श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन तृप्ती राठोड यांनी केले. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती.

या स्पर्धेत २३ ते ४० व ४१ ते ५५ वर्ष असे दोन वयोगट होते. २०० हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होता. त्यांच्या पहिल्या फेरीतून प्रत्येक गटातील प्रत्येकी १२ महिलांची निवड करण्यात आली. त्यात टॅलेंट, स्वपरिचय व प्रश्नोत्तरे अशा फेऱ्या होत्या. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटांतून करण्यात आली. फाल्गुनी झेंडे यांनी कोरिओग्राफी केली.

या कार्यक्रमात सूरज डान्स अॅ्कॅडमी (रेट्रो थीम) यांनी नृत्य सादर केले. या स्पर्धेच्या समन्वयक अ‍ॅड. अमृता जगधने होत्या. सुप्रिया ताम्हाणे व अर्चना सोनवणे यांचे मोलाचे साहाय्य लाभले. सर्व स्पर्धकांना ‘टायटल अवॉर्ड’ देण्यात आले.

या स्पर्धेमुळे विवाहित महिलांना स्वतःचा आत्मविश्वास, कला आणि व्यक्तिमत्त्व सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचे स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!