शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान पुणे निर्मित संगीत सौभद्रचा प्रयोग सादर करण्यात आला.
१४२ वर्षांपूर्वीचे हे संगीत सौभद्र आजही तरुण आहे. रसिकांच्या मनावर या नाटकाची मोहिनी अजूनही तशीच आहे. या चिरतरुण नाटकात भूमिका करणारे कलाकार देखील तरुण पिढीतील आहेत. मुख्य भूमिका चिन्मय जोगळेकर, अभिषेक अवचट, सन्मिता धापटे, तेजस मेस्त्री, स्नेहल पोतदार यांनी उत्तम सादर केल्या आणि रसिकांची वाहवा मिळवली. श्रेयस इंदापूरकर, ऋतुपर्ण पिंगळे, स्मिता पाटील पूजा पारखी, मंदार जोशी, वेदांत जोशी, आमोद केळकर यांच्याही भूमिका उत्तम झाल्या. स्वानंद नेने – ऑर्गन आणि कार्तिकस्वामी दहिफळे यांच्या सुंदर साथीने प्रयोग रंगला. या संगीत नाटकास रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई आणि मोहन टिल्लू यांच्या हस्ते स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ नाट्यसंगीत गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या कन्या श्रीमती दीप्ती भोगले यांचा सत्कार चिन्मय जोगळेकर यांनी स्वीकारला.
या नाटकाचे दिग्दर्शन अशोक अवचट यांनी केले. याची निर्मिती चारुशीला केळकर यांची आहे. संगीत मार्गदर्शन सुचेता अवचट यांनी केले. चारुशीला केळकर यांनी सुत्रसंचालन केले. सुचेता अवचट यांनी आभार मानले.