पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी:
आज मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा सण रमजान ईद मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे.
यानिमित्ताने आज सकाळीच पिंपरी चिंचवड शहरात सर्वच मशिदीत तसेच ईदगाह येथे रमजान ईद (ईद उल फित्र) ची नमाज अदा करण्यात आली, या नमाज करिता शहरातून असंख्य मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज अदा केली. तसेच सर्व मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवांनी रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद निमित्त आज प्रत्येक मुस्लिम समाजातील कुटुंबात शीरखुर्मा व शेवई सारखे गोड पदार्थ बनवले जातात तसेच मित्र मंडळी नातेवाईक यांना ईद निमित्त निमंत्रित केले जाते व सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजान ईदचा आनंद घेत असतात. हीच आपल्या देशाची परंपरा आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन सणसमारंभ साजरे करत असतात,कालच गुढीपाडवा हा हिंदू बांधवांचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला व आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. काही दिवसापूर्वी काही राजकीय मंडळींनी समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली होती अशा परिस्थितीत गुढीपाडवा व रमजान ईद सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत साजरी केली व आपली महाराष्ट्राची व देशाची एकात्मतेची परंपरा कायम असल्याचे दाखवून दिले.