शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल मधील दोन वर्ष ते सहा वर्ष पर्यंतच्या चिमुकल्यांनी शिक्षणासोबतच आपली कला अंगी असल्याचे एक ज्वलंत उदाहरण कृष्णा नगर ब्रांच मधील चिमुकलांनी नुकतीच करून दाखवली. घरगुती टाकाऊ वस्तूंपासून, झाडू, रबर,काठ्या, बाहुली, कापूस,खराब झालेले थर्माकोल, अशा खराब झालेले वस्तूंपासून अतिशय सुंदर गणपती या चिमुकल्यांनी बनवून आज कृष्णा नगर प्रभागातील नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले होते त्याचा मनमुराद आनंद सर्व नागरिकांनी व पालकांनी घेतला व मुलांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी कृष्णा नगर ब्रांच च्या चेअरमन सौ कीर्ती मारुती जाधव व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.