spot_img
spot_img
spot_img

माझं स्वप्न अजित पवारांनी पूर्ण केलं – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझे स्वप्न पूर्ण केले. तसेच आता अजित पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे अख्ख्या महाराष्ट्राचे स्वप्न आहे तेही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे विधानसभा चे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात काल दाखल झाले.मुंबई ते पिंपरी चिंचवड दरम्यान त्यांचं जागोजागी फटाक्याच्या आतिषबाजी आणि फुलांच्या हराने स्वागत करण्यात आले.

यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की मागासवर्गीय आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तीला अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष केलं अजित पवारांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सोबत राहिलो आहे हे प्रामाणिकपणाचे फळ मला मिळालं तसेच महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आगामी महानगरपालिकेसाठी मान्य असेल असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.

अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार समारंभ काल पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात संपन्न झाला. या कार्यक्रमात हजारचे संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली अण्णा बनसोडे यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!