spot_img
spot_img
spot_img

गणेशोत्सवात नाट्य कले च्या माध्यमातून समाजप्रबोधन हि खूप समाधानकारक बाब – प्रा.राजेश सस्ते

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक भोसरीचे माजी चेअरमन प्राध्यापक राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या नवव्या दिवशी अनेक गणेश मंडळांना,सोसायटी धारकांना भेटी दिल्या व गणरायाची आरती केली. या मध्ये ऑस्टिया सोसायटी डुडुळगाव, ऑर्बिट व्हिला सोसायटी शिवाजीवाडी, वाटिका सोसायटी मोशी गावठाण व गंधर्व नगरीतीतील मंडळातील आरती व महापूजेनिमित्त भेटी गाठी दिल्या.

या गणेशोत्सवात प्राध्यापक राजेश सस्ते यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या, गणेशोत्सवानिमित्त आरास, देखावे सादर न करता समाज प्रबोधन करणारे नाटक सादर करणारे नाट्य कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी गणेश मंडळांनी यावर्षी अनेक ठिकाणी नाटकांच्या माध्यमातून गणेश भक्तांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे त्यांनी आभार व्यक्त केले. नाट्यकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गणेश मंडळांनी यावर्षी नाट्य कलाकारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. वेगवेगळ्या सामाजिक नाटकातून, विविध सामाजिक संदेश गणेश भक्तांपर्यंत याद्वारे पोहोचविण्यात आला आहे. तसेच या उपक्रमामुळे अनेक नाट्यकालाकारांना त्याचा लाभ ही मिळाला ,असे अनेक नाट्य कलाकार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे, नाटकात काम करण्याची संधी काहींनाच मिळते, तर काही कलाकारांना त्या संधी उपलब्ध होत नाही ,परंतु या गणेशोत्सवात या नाट्य कलाकारांना गणेश मंडळांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याने ,अनेक नाट्य कलाकार हे आपली कला सादर करू शकले व या माध्यमातून त्यांना रोजगारही मिळालाव नाट्य कले च्या माध्यमातून समाजप्रबोधन झाले ही खूप समाधानकारक बाब असल्याचे प्राध्यापक राजेश सस्ते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!