शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये १५ वर्षांखालील मुला मुलींसाठी आयोजित स्केटिंग स्पर्धेत ५५० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. बावधन येथील एल एक्स टी अकेडमी येथे त्यांच्यातर्फे महारष्ट्र स्केटिंग असोशिएशनच्या सहकार्यांने पुणे फेस्टिव्हलमध्ये ही एल एक्स टी ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धा पार पडली. अंतररष्ट्रीय कीर्तीचे स्केटिंग पटू राहुल राणे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रिटा राणे या स्पर्धेच्या समन्वयक होत्या.
आयर्न मॅन असा लौकिक प्राप्त केलेल्या अक्षय जोगदेव यांनी याचे उद्घाटन केले. बक्षीस वितरण प्रसंगी पुणे फेस्टिव्हल क्रीडा समितीचे प्रमुख प्रसन्न गोखले उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
प्रोफेशनल इनलाइन अबाउ १४ कॅटेगीरी – मुले
सौरभ भावे – सुवर्ण
हर्षित घरात – रौप्य
साई आंबे – कस्य
प्रोफेशनल इनलाइन अंडर ७ कॅटेगीरी – मुले
शार्विल देवकाते – सुवर्ण
शौर्य जगताप – रौप्य
झाईन शेख – कास्य
प्रोफेशनल इनलाइन अंडर ७ कॅटेगीरी – मुली
रीशिका कर्वा – सुवर्ण
सरिया सेतुया – रौप्य
सिया यादव – कास्य