३७ व्या पुणे फेस्टिवल महिला महोत्सवमध्ये किचन क्वीन पाककला स्पर्धा डेक्कन कॉर्नर येथील सावरकर स्मारक भवन येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी पौष्टिक टिफिन हा विषय देण्यात आला होता. यामध्ये नवनवीन कल्पना वापरून महिलांनी नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थ बनवले होते. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पाककला तज्ञ किशोर सरपोतदार, ऋषिकेश गोखले, डॉ. अमित मुंगळे, मुग्धा ठाकुरदेसाई आणि पल्लवी भट यांनी काम पाहिले. या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक उल्का ओझरकर, द्वितीय अंजली किणी, तिसरे पारितोषिक वर्षा तेलंग यांना यांना देण्यात आले तर उत्तेजनार्थ पारितोषिक किरण वासवानी, वर्षा दोभाडा आणि पल्लवी पायगुडे यांना देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस महाराष्ट्र मंजुषा मुळीक, महाराष्ट्र झोनल हेड, रेडिओ मिरचीच्या स्मिता त्रिभुवन, उद्योजिका सारिका मर्चंट, सौंदर्यतज्ञ अंजली जोशी, अभिनेत्री प्रतिभा भगत, गायिका अनुपमा कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन करुणा पाटील आणि शिल्पा चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन वेदांती राव यांनी केले.
फोटो ओळ – डावीकडून संयोजिका करुणा पाटील, द्वितीय विजेती अंजली किणी, प्रथम विजेती उल्का ओझरकर, तृतीय विजेती वर्षा तेलंग आणि शिल्पा चव्हाण
फोटो ओळ – डावी कडून संयोजिका करुणा पाटील, द्वितीय विजेती अंजली किणी, प्रथम विजेती उल्का ओझरकर, तृतीय विजेती वर्षा तेलंग आणि शिल्पा चव्हाण