पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) रोट्रॅक्ट क्लब, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या वतीने नुकतेच पीसीईटी शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगर व रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे समन्वयन दिंभा फाउंडेशनने केले. या शिबिरामध्ये पीसीईटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.
शिबिराचे आयोजन यश नेहरकर, अजित मिटकरी, रुतुजा थिटे, राधिका मंत्री, मंथन जाधव व आदित्य जगदाळे या एस. बी. पाटील सीओएडी रोट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. प्राचार्या डॉ. स्मिता सुर्यवंशी, आर्किटेक्ट शिल्पा पाटील, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. याला विद्यार्थी व शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रक्तदान केलेल्या दात्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.