spot_img
spot_img
spot_img

वायसीएम रुग्णालयात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा कार्यान्वित

आपत्कालीन सेवांना मिळणार बळकटी

पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक रुग्ण निवड (Advanced Triage Facility) आणि पुनर्जीवन सुविधा (Resuscitation Facility) उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आपत्कालीन सेवांना बळकटी मिळणार आहे. डाना टीएम फोर इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डाना टीएम फोर इंडिया लिमिटेडचे प्लांट हेड शिवाजी निळकंठ, एचआर व प्रशासन विभागाच्या प्रमुख योगिता सुषीर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नियोजित ट्रायेज सुविधेमुळे रुग्णांच्या प्रकृतीच्या गंभीरतेनुसार त्यांचे जलद मूल्यमापन आणि प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होणार आहे. तर पुनर्जीवन सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे. गंभीर आजारी रुग्णांना जलद, प्रणालीबद्ध आणि उच्च गुणवत्तेची सेवा देण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत.

डाना टीएम फोर इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांची सेवा करण्याच्या रुग्णालयाच्या क्षमतेत यामुळे नक्कीच वाढ होईल.
• डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब, बेघर आणि रोजगारासाठी राज्यातील इतर तसेच परराज्यातून आलेल्या रुग्णांना तातडीची मदत देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अविरत काम करते. या रुग्णालयाला सीएसआर फंडातून मदत करता आल्याचा खूप आनंद होत आहे.
• शिवाजी निळकंठ, प्लांट हेड, डाना टीएम फोर इंडिया लिमिटेड

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!