शबनम न्यूज , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील फ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या राहुल नगर मध्ये काळा सरवंट हे अंगावर खाज आणणारे किडे मोठे त्रासदायक ठरत आहेत, नागरिकांच्या घरामध्ये शिरकाव या किड्यांनी केलाय ,अनेक नागरिकांना व लहान मुलांना याचा त्रास होत आहे. वृद्ध नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या किड्यांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहराचे महासचिव महेश अरुण यांनी केली आहे. येथील रहिवाशांच्या वतीने हि मागणी जोर धरत आहे.. या काळासरवंट, मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा किडा याचा नायनाट करण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहराचे महासचिव महेश अरुण यांनी केली आहे आणि जर चार दिवसात यावर उपाययोजना झाली नाही तर हे किडे फ प्रभाग कार्यालयात सोडण्यात येतील असा पालिका प्रशासनाला इशारा महेश अरुण यांनी दिला आहे.