शबनम न्यूज प्रतिनिधी : ( मावळ ) संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे यांनी आज सहारा वृध्दाश्रमात प्रवचन व किर्तनाचा निराधार आजी आजोबांना लाभ दिला .
आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात अनाथ निराधार आजी आजोबांसाठी वृध्दाश्रम आहे. रस्त्यावर सापडलेल्या १४ जणांचा येथे सांभाळ केला जातो.
या ठिकाणी गणरायाच्या उत्सवात प्रशांत महाराज मोरे यांनी “आनंदाचे डोही आनंद तरंग” हा अभंग निवडून त्यावर निरूपण केले.
आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी स्वागत केले तर जयश्री खिरे या आजींनी आभार मानले.