गणेशोत्सवा मुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा होत आहे. अनेक गणेश मंडळे आकर्षक देखावे सादर करत आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिश आनंदराव बारणे यांच्यावतीने गणेश विसर्जना करिता कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव नेहमी आतिश बारणे यांच्या वतीने साजरा करण्यात येतो. याकरिता पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी आतिश बारणे व त्यांचे सहकारी घेत असतात. मोशी परिसरातील पकवान हॉटेल जवळ, बारणे वस्ती, येथे आतिश बारणे यांच्या वतीने कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक छोटे मोठे गणेश मंडळे गणरायाचे विसर्जन करताना या कृत्रिम तलावाचा उपयोग करत आहे.
“श्रद्धा जपूया निसर्ग वाचूया कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन करूया”असा पर्यावरण पूरक संदेश देत अतिश बारणे यांच्या वतीने दरवर्षी कृत्रिम चालावाचे आयोजन केले जाते दरवर्षी शेकडो गणेश भक्त या तलावाचा उपयोग करतात याही वर्षी या तलावाचे आयोजन करून गणेश मंडळ व घरगुती गणपती भक्तांनी या कृत्रिम तलावाचा उपयोग करावा असे आवाहन आतिश बारणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.