पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक भोसरीचे माजी चेअरमन प्राध्यापक राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या सहाव्या दिवशी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या व गणरायाची आरती केली तसेच नागरिकांशी संवाद साधला या मध्ये जय तुळजा भवानी मित्र मंडळ, क्षितिज सोसायटी, डुडुळगाव, नक्षत्र इलॅन्ड सोसायटी, स्वप्नलोक सोसायटी तसेच मोशी व डुडुळगाव परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाची आरती करून आशीर्वाद घेतला आणि प्रत्येक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
गणेश उत्सव काळात गणेश मंडळांनी तसेच सोसायटी धारकांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने देखावे सादर करताना समाज प्रबोधन करणारे देखावे सादर करावे. तसेच पौराणिक कथेतून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करावे , याचबरोबर अनेक गणेश मंडळे ही नाट्य कलाकृतीतून सामाजिक संदेश देण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्यांचा हा प्रयत्न खरच कौतुकास्पद असल्याचा उल्लेख प्राध्यापक राजेश सस्ते यांनी यावेळी केला.