पिंपरी,चिंचवड : गणेशोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे या गणेशोत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांनी विविध विषयांवर देखावे साजरे केले विविध आकर्षक सजावटी केलेल्या आपणास पहावयास मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील सेक्टर नंबर २७, प्लॉट नंबर ३३८, रामेश्वर सदन या ठिकाणी राहणारे राहुल बबन महांगरे, प्रसाद बबन महांगरे, ओम राहुल महांगरे, प्रसाद महांगरे या महांगरे परिवाराच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त सर्व कुटुंब एकत्र येत विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध आकर्षक व समाज उपयोगी देखावे या परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे. या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत अष्टविनायक गणपती इको फ्रेंडली देखावा यावर्षी या परिवाराच्या वतीने करण्यात आलेला आहे. अनेक पुठ्यांचा वापर करत आकर्षक देखावा करण्यात आलेला असून हा देखावा अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
महांगरे परिवाराच्या वतीने यावर्षी अष्टविनायक गणपतीचे विविध आठ रूप व त्यांची नावे या देखाव्यात सादर केली असून आकर्षक विद्युत रोषणाई ही या देखाव्यात करण्यात आली आहे. आकुर्डी परिसरात या देखाव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.