पुणे: अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 63 वे वर्षे साजरे करत आहे. सामाजिक समानतेचा आदर्श ठेवून कार्यरत आहे. मागील 20 वर्षापासून दरवर्षी मंडळ सामाजिक विषयावर भाष्य करणारे देखावे सादर करत आहे. अध्यक्ष नरेश राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाने या वर्षी एक अतिशय विशेष संदेशात्मक उपक्रम सादर केला. “मी आता प्रसाद रुपी समतेचा वडापाव”. हा जिवंत देखावा सामाजिक समतेचा प्रभावी रूपात्मक संदेश होता. प्रत्येक जिवंत देखाव्यानंतर भाविकांना जात-धर्मादरहित प्रसाद म्हणून “वडापाव” वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमात संगमनेर येथील प्रसिद्ध वडापाव विक्रेते,अन्सार चाचा इनामदार, यांनी आपल्या आवाजात जात-धर्म न पाहता सर्वांमध्ये समानतेचा संदेश दिला, ज्यामुळे जनतेमध्ये खूप चांगला आदर्श निर्माण झाला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा “जीवंत देखावा” साकारण्यात येतो.या जीवंत देखाव्याची संकल्पना डॉ. आनंद करंदीकर यांची असून उमेश वाघ यांनी निर्मिती केले आहे. अन्सार चाचा इनामदार यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या जीवंत देखाव्याचे संयोजन मंगला पाटील, विनोद सकट, अशोक खुडे, संजय मयेकर, अभिजीत धाडवे, विवेक कांबळे, संकेत बागडे आदि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी गणेश कांबळे, अशोक खुडे,प्रकाश भुरटे, मनोज बसवंत, विलास खराडे, अभिजीत धाडवे, किरण भंवर, योगेश शिनगारे, किरण लोखंडे,गौरव शिंदे,अमर कांबळे, अमर बेंद्रे, अथर्व जगताप, सोहम गोरे आदि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.