spot_img
spot_img
spot_img

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचा मल्हार मार्तंड कार्यक्रम उत्साहात

पुणे: ढोले पाटील गणपती मंदिर आयोजित गणेशोत्सवात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला मल्हार मार्तंड हा सांस्कृतिक कार्यक्रम विशेष गाजला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिनय, नृत्य, वेशभूषा आणि कलाकौशल्याचा सुंदर मिलाफ घडवून सर्वांना प्रभावित केले. विशेष म्हणजे, नुकतेच प्रवेश घेतलेल्या अकरावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट कला सादर केली व कार्यक्रमाची उंची वाढवली.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर संस्थेच्या सेक्रेटरी सौ. उमा मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय कर्मचारी, विविध विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सर्वांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!