spot_img
spot_img
spot_img

सौ. अर्चना राजेश सस्ते यांची गौरी गणपती व हळदीकुंकू समारंभात उल्लेखनीय उपस्थिती

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचबरोबर गौरी गणपती चे आगमन झाले आहे. यानिमित्ताने मोशी परिसरातील जय मल्हार सुवर्ण संचय योजने च्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई राजेश सस्ते यांनी मोशी परिसरातील आपल्या प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक ठिकाणी गौरी गणपती निमित्त तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित राहत गणेशोत्सव व हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला.

सौ. अर्चना राजेश सस्ते यांच्या मार्फत महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. महिलांचे विविध प्रश्न हाताळण्यात सौ अर्चना राजेश सस्ते या नेहमी अग्रेसर असतात. सामाजिक कामाचा वसा उत्तम प्रकारे त्या चालवीत आहेत.

अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, महिलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे, महिलांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणे असे अनेक उपक्रम सौ. अर्चना राजेश सस्ते यांच्या माध्यमातून होत आहेत. मोशी परिसरातील आदर्श नगर, शिवाजी वाडी, लक्ष्मी नगर, डुडुळगाव ,बोर्हाडे वाडी, मोशी गावठाण, नागेश्वर नगर अशा विविध ठिकाणी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला तसेच गौरी गणपती आरती निमित्ताने सौ अर्चना राजेश सस्ते यांनी हजेरी लावत गणरायाची आरती केली.मोशी परिसरात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक महिला संघटन सौ. अर्चना राजेश सस्ते यांच्या पाठीशी आहे. असे या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात दिसूनही आले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!