spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक निर्गमित केलेले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार तसेच उप आयुक्त आण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली “भटके विमुक्त दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.

भाटनगर,पिंपरी येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी शिक्षण व इतर योजनांची माहिती जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना दिली. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी व बांधवांनी घ्यावा असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी माजी महापौर कविचंद भाट,सामाजिक कार्यकर्ते मनोज माछरे, विकी तामचीकर, सुभाष माछरे,भुपेंद्र तामचीकर,अभय भाट, सनी मलके, राज माछरे, नरेंद्र तामचीकर, अक्षय माछरे तसेच शालेय विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
भाटनगर येथील कार्यक्रमात भटके विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनपद्धती आणि संघर्षाबाबत माहिती देण्यात आली तसेच जात प्रमाणपत्र,आधार कार्ड यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!