शबनम न्यूज | प्रतिनिधी
अध्यापनाचे काम करणाऱ्या शामला पंडित ( दीक्षित ) यांनचे १६ कवितासंग्रह, १ कथासंग्रह प्रकाशित आहेत ,तसेच ३ पुस्तके प्रकाशन मार्गावर आहेत. त्यांच्या ‘अमृतकुंभ ‘ ,’ अष्टपैलू’ , ‘ दरवळ ‘ कवितासंग्रहाला विशेष पुरस्कार मिळाले आहेत . विद्यार्थ्यांनी ‘पुष्पांजली ‘ पुस्तकाची हस्तलिखित तयार केली आहेत . त्यांच्या लेखनातून समाजातील वास्तव, स्त्री-जीवनातील संघर्ष आणि मानवी भावभावनांचे संवेदनशील चित्रण आढळते. .त्यांनी प्रणाली प्रकाशनच्या माध्यमातून चाळीसपेक्षा अधिक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्यांनी “शामलाक्षरी ” (समान शब्द, अर्थ भिन्न )असलेल्या नवकाव्य प्रकाराची देणगी मराठी साहित्याला दिली आहे. “शामलाक्षरी ” हा काव्य प्रकार साहित्यिकात रूढ झाला असून शामलाक्षरी काव्य प्रकारात पाच प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. अध्यापिका म्हणून शालेय स्तरावर नाट्यसंहिता लेखन , दिग्दर्शन त्यांनी केल आहे .सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत अनेक वेळा यश संपादन केले आहे .पिंपरी चिंचवडचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,मुंबई व धुळे येथील साहित्यरत्न पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत .
या पुरस्काराबद्दल बोलताना शामला पंडित म्हणाल्या, ‘हा पुरस्कार केवळ माझा नसून, मला प्रेरणा देणाऱ्या सर्व संस्था पदाधिकारी , शिक्षकांचा आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. मी यापुढेही सातत्याने लेखन करत राहीन.’ त्यांच्या साहित्यसेवेमुळे अनेक तरुण लेखकांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. .
खासदार मा.श्रीरंग बारणे,विधानपरिषद मा .आमदार अमित गोरखे, मा.उमाताई खापरे,कलारंग सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार माने.,माजी आमदार अश्विनीताई जगताप,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून साहित्यिकांना गौरविले.
त्याप्रसंगी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, अनिल सौंदळे,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक शितल शिंदे, भाजपा महिला उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे,नगरसेवक राजेंद्र बाबर,संदीप वाघेरे, अमित गावडे,कैलास कुटे,सुजाता पालांडे,जयश्री गावडे, वैशाली काळभोर, राजू दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते मनोज सूर्यवंशी, हभप अशोक महाराज गोरे, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रासह साहित्य विश्वातही आनंदाचे वातावरण आहे.