शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोसरी एमआयडीसी परिसरात स्वच्छतेचा श्री गणेशा करण्यात आला. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुढाकारातून आणि अध्यक्ष श्री अभय भोर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यात आला आहे.
महानगरपालिका व बीव्हीजी ग्रुप आणि महानगरपालिका उपायुक्त श्री सचिन पवार साहेब यांच्या सहकार्याने प्रत्येक कंपनीमधून नियमित कचरा उचलण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी मोठ्या उत्साहात झाला. तसेच महानगरपालिका उपायुक्त श्री पवार साहेब यांच्या सहकार्याने या प्रकल्पाअंतर्गत औद्योगिक परिसरासाठी जादा वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून कचरा उचलणाऱ्या गाड्यांवर सायरन बसविण्यात आले आहेत. आणि एमआयडीसी परिसरातील प्रत्येक ब्लॉक मध्ये आता कंपन्यांमधील कचरा उचलण्यासाठी जादाची वाहने देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे कचरा गाडी आल्याची सूचना कंपन्यांना त्वरित मिळणार असून उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमाला एमआयडीसी परिसरातील असंख्य उद्योजक उपस्थित होते. उपस्थित उद्योजकांनी स्वच्छता गाड्यांना नारळ फोडून शुभारंभ केला व “माझी एमआयडीसी – स्वच्छ एमआयडीसी, हरित एमआयडीसी” हा संकल्प करून परिसर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. तसेच कचरा गाड्यांना पुष्पहार अर्पण करून आणि नारळ वाढवून उद्योजकांतर्फे स्वागत करण्यात आले. तसेच यांचे देखील उद्योजकांनी आभार व्यक्त केले
असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर म्हणाले, “भोसरी एमआयडीसीसारख्या औद्योगिक परिसरात नियमित व वेळेवर कचरा उचल होणे ही उद्योजकांची मोठी गरज होती. अनेक वर्षांपासून या समस्येवर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर महानगरपालिका व बीव्हीजी ग्रुपच्या सहकार्याने तो मार्गी लागला. पुढील काळात प्रत्येक कंपनीमधून कचरा उचलण्यासाठी आणखी वाहने उपलब्ध करून दिली जातील.”
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
या प्रसंगी भोसरी एमआयडीसीतील अनेक उद्योजक, असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अभय भोर – अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, उपाध्यक्ष वैभव जगताप ,शिवाजी पाटील,विकास मनघांनी ,कमलेश दास, रितेश टोलिया ,प्रथमेश जंगले ,सचिन जाधव ,रामभाऊ दरवडे,सचिन भगत आणि अनेक उद्योजक उपस्तिथ होते.