spot_img
spot_img
spot_img

सीएमएस शाळेत घडले “वसूधैव कुटुंबकम”चे दर्शन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड मळ्याळी समाजम संचलित निगडी येथील सीएमएस शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेह संमेलनात “वसुधैव कुटुंबकम”चे विद्यार्थ्यांनी दर्शन घडवले.

यावेळी उपसभापती अण्णा बनसोडे, माजी उप महापौर राजू मिसाळ, सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,खजिनदार पी. अजयकुमार,उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, जॉय जोसेफ, कलावेधी अध्यक्ष पी.व्ही भास्करन, सह खजिनदार राम कृष्णन, फॅन्सी विजयन प्राचार्या बीजी गोपकुमार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बनसोडे म्हणाले कि,गेली २८ वर्षांपासून सी एम एस उत्तम शिक्षण देण्याचे कार्य करित आहे. उत्तम विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत असताना क्रीडा कडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्ष संवर्धनाचा उपक्रम जोमाने करणारी हि राज्यातील पहिलीच शाळा आहे. अशा शब्दात कौतुक केले.
अध्यक्ष विजयन म्हणाले कि आमचा विद्यार्थी राज्य स्तरावर चमकेल. सर्वांगीण शिक्षण देण्यात साठी आमही कटीबद्ध आहोत.
सरचिटणीस नायर म्हणाले कि, विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता शिकता यावी यासाठी ठोस पावले शाळेने उचलेले आहे तरी हा प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सोफिया मार्गारेट, सोनाली पवार, सजिता पिल्ले, आराधना जगताप, सुजाता चव्हाण या शिक्षकांचा तसेच वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेणारे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिंधू नायर, नयना शेपार्ड यांनी केले तर आभार प्रतीक्षा दळवी यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!