अन्नधान्य वाटपाचा उपक्रम तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवत दीपक सेठ मेवाणी यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप
पिंपरी चिंचवड : चिंचवड ( प्रतिनिधी ): पिंपरी चिंचवड शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या पुढाकाराने आकाश मित्र मंडळ वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश स्थापनेच्या दिवशी पूरग्रस्तांना केलेली अन्नधान्याची मदत ही उल्लेखनीय ठरली या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुंदर कांबळे यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
शहरातील अनेक मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती होत आहे. या गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दीपक सेठ मेवाणी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली तसेच अन्नधान्य वाटपाचा उपक्रम तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवत प्रभाग क्रमांक 19 मधील पत्रा शेड मधील पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करण्यात आले याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आनंद नगर शाखेचे अध्यक्ष दिनकर म्हस्के व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.