पिंपरी चिंचवड : मोशी ( प्रतिनिधी ):
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित भोसरी चे मा. चेअरमन प्रा.राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी मंगलमय वातावरणात अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या व गणरायाची आरती केली.यानिमित्ताने आपण सर्वांनीच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करायला हवा त्यामुळे प्रदूषण व आरोग्याच्या दृष्टिकोनातून वातावरण निर्मिती करण्यास मदत होते. पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश मंडळांनी भर द्यावा तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करतानाही पर्यावरणाचा विचार करण्यात यावा व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा असे आपल्या मार्गदर्शनात प्रा. राजेश सस्ते यांनी सांगितले, या मध्ये तरुण मराठा मंडळ संस्तेवाडी मोशी,संगम मित्र मंडळ मोशी गावठाण, शिवप्रताप मित्र मंडळ मोशी गावठाण , शिवतेज मित्र मंडळ मोशी गावठाण , करिष्मा सोसायटी शिवाजीवाडी, माधव सोसायटी शिवाजीवाडी, या गणेश मंडळाला भेटी देत आरती केली . प्रा. राजेश सस्ते यांनी सांगितले कि गणेश उत्सव निमित्ताने व सत्यनारायणा पूजन निमित्त सर्व मंडळांना भेट व आरती चा मान मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. “गणपती बाप्पा मोरया!”