शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७ व्या पूणे फेस्टिव्हल मध्ये पूण्याच्या ‘स्वतंत्र थिएटरने’ बालगंधर्व रंगमंदिरात सादर केलेले “अझगर वजाहत लिखित “जिस लाहोर नई देख्या, ओ जमैय नई” (जर तुम्ही लाहोर पाहिले नाही तर तुम्ही जन्माला आला नाही) हे अत्यंत गाजलेल्या नाटकाने पुणेकर रसिकांना मंत्रमुग्ध केले, अझगर वसाहत हे हिंदी साहित्यातील एक प्रसिद्ध विद्वान, कथालेखक, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ख्यातनाम आहेत , तसेच ते ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे सदस्य आहेत , त्यांच्या अनेक गाजलेल्या साहित्यकृतींपैकी भारताच्या फाळणीवरील या नाटकाचे जगातील अनेक देशात प्रयोग झाले आहेत. युवराज शहा यांनी हे नाटक निर्मित केले असून अभिजीत चौधरींनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. याच नाटकात पंजाबी हिंदू वृद्ध स्री ची भूमिका करणाऱ्या धनश्री हेबळीकर यांनी नाटकाचे कला दिग्दर्शन केले असून, नाटकातील पार्श्व गायनही केले आहे.
फाळणीनंतर लाहोर मधील आपली मूळ मालकीची हवेली सोडण्यास नकार देणाऱ्या एका वृद्ध पंजाबी हिंदू महिलेची कथा हे नाटक सांगते. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या आणि तेथिल तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या मुस्लीम कूटूंबाना तेथिल पाकिस्तानी सरकार हिंदूंची रिकामी झालेल्या घरांमध्ये पूर्नवसित करीत असतात अशीच एक २२ दालनांची रतनलाल जोहरीची हवेली लखनौमधून गेलेल्या सिकंदर मिर्झा कुटुंबाला सरकार तर्फे दिली जाते , मात्र त्या भव्य हवेलीत ही हिंदू स्री आधीच एकटी रहात असते, फाळणीतील दंगलीत बेपत्ता झालेल्या आपल्या रतनलाल या मूलाची वाट पहात ती आपले जीवन तिथे कंठीत असते. ज्या मिर्झा कूटूंबाला ही हवेली मिळते ते तीला तेथून बाहेर काढण्यासाठी सूरूवातीला खूप प्रयत्न करतात , प्रसंगी स्थानिक गूंडाकरवी तीला मारण्यासाठी कटही रचतात, पण हळू हळू माईच्या वात्सल्यपूर्ण व्यवहारामूळे सिंकदर मिर्झाचे कूटूंब परिवर्तित कसे होत जाते आणि तो स्नेहबंध शेवटी कसा घट्ट होत जातो ,शेवटी सगळा परिवार तिच्या इतक्या आकंठ प्रेमात कसा पडतो , याची अत्यंत संवेदनशील अशी ही कहाणी आहे, लाहोरच्या अख्ख्या मोहल्यात असलेली एकमेव हिंदू वृद्धा ही अवघ्या परिसराचा कसा आधारवड असते, आणि ती गूंडाच्या त्रासाने वैतागून जेव्हा भारतात जायला निघते तेव्हा तेथिल सृजन समाज आणि पुत्रवत सिकंदर तिच्या पाठीशी कसे भक्कमपणे उभे राहतात यांची अत्यंत तरलपणे सरकत जाणारी कहाणी प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवते, हे नाटक संपूर्ण भारतभर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सादर केले गेले आहे.
यापूर्वी, हबीब तन्वीर आणि दिनेश ठाकूर सारख्या प्रसिद्ध नाट्यव्यक्तींनी त्याचे दिग्दर्शन केले आहे, इतकेच काय राजकुमार संतोषींचा याच विषयावर चित्रपटही येत आहे , मात्र स्वतः अझगर वझाहतांनी त्यांच्या पुणे भेटीत “स्वतंत्र थिएटरच्या” सादरीकरणाची मुक्तपणे प्रशंसा केली होती, अशी माहीती स्वतंत्र थिएटरचे संस्थापक व नाटकाचे निर्माते युवराज शहा यांनी या प्रसंगी सांगितली, या नाटकामध्ये धनश्री हेबळीकर, राजीव भारद्वाज, प्रेम गौडा, हुजैफ खान, अमृता गडाख, मृणाली फापाळे, अथर्व गोसावी, अनुराग मिश्रा, सुमित तुपारे, सचिन कसबे, शुभम कुमार, आदित्य सिंह, इस्माईल मुलानी, हदीश खान, अतुल गोसावी, मोहित रानडे, श्रुती राणे, सुफियान आलम, इस्माईल मुलानी तसेच प्रवेश साकोरे यांनी संगीत व अश्विन शर्मा याने लाइट्स केले.सूफीयान आलमचा शायर नाझिर काजमी आणि अथर्व गोसावीचा कर्मठ गुंड लोकांना विशेष भावला.
सर्व कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखा इतक्या प्रभावीपणे सादर केल्या की गच्च भरलेल्या बालगंधर्व नाट्यगृहात टाळ्यांचा सारखा कडकडाट होत होता. नाटक संपल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी मंचावर येवून आपल्या प्रतिक्रिया उस्फू्तपणे व्यक्त केल्या आणि पुणे फेस्टिव्हल संयोजकाचे आभार मानले. या प्रयोगाला पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांकृतिक कार्यक्रम प्रमुख डॅा सतिश देसाई व बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते युवराज शहा व सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.