शबनम न्यूज | प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या सहकार्याने दिनांक ३० व ३१ ऑगस्ट या दोन दिवशी पुणे फेस्टिव्हल मल्लखांब स्पर्धा संपूर्ण दिवस पार पडल्या. ३७व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मल्लखांब स्पर्धेत ईशान जाधव आणि रमा गोखले सर्वोत्कृष्ट मल्लखांब पटू ठरले. पुरलेला खांब व रोप या वरील या स्पर्धेत १५ वर्षांखालील ३५० हून अधिक मुला मुलींनी सहभाग घेतला. पुणे फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्र मंडळाने याचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. यावेळी रोहन दामले पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सतीश देसाई व क्रीडा समिती प्रमुख प्रसन्न गोखले, उपस्थित होते.
या स्पर्धेत मुला-मुलींनी मल्लखांब आणि रोपवर कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. महाराष्ट्र मंडळाचे अभिजित भोसले व सचिन परदेशी हे या स्पर्धेचे समन्वयक होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
उत्कृष्ठ खेळाडू ( मुले ) ईशान जाधव
उत्कृष्ठ खेळाडू ( मुली ) रमा गोखले
अंडर १० (मुले)
१. रुद्र शिंदे, २. वरद गायकवाड ३. मल्हार बाबर
उत्तेजनार्थ
४. विक्रम आदित्य सोनाळे, 5. मोहन दोषी, ६. निनाद खांबे
अंडर १२ (मुले)
१. आर्यन कोरे, २. शिवांक मारणे, ३. अवधूत भंडारी
उत्तेजनार्थ
४. श्रीराज जाधव ,5. संकेत ढेरे, ६. सदानंद कोरडे
अंडर १४ (मुले)
१. संग्राम पारंडे २. आदित्य भरगुडे ३. सर्वेश देशपांडे ४. रचित घोडके ५. राजवीर परदेशी ६. श्रीराम गौड ७. अनिश दगडे
अंडर १८ (मुले)
१. ईशान जाधव २. ओम खामकर ३.अथर्व मोरे ४. अनुज भंगळे, 5. सोहम विचारे ६. आदित्य कदम
अंडर १० (मुली)
१. ओवी कुडपणे २. त्रिशा झांजेपाटील ३. आश्लेषा दाभाडे ४. शृष्टी गायकवाड 5. स्वराली विचारे ६. संवी वझे
अंडर १२ (मुली)
१. स्पृहा लांडगे २. आरल सोनावणे ३. अंजली गायकवाड ४. अन्वी पवार 5. मेघा गोंधळेकर ६. अयोध्या भेगडे
अंडर १४ (मुली)
१. हिरणमयी दाभाडे २. रमा गोखले ३. मधुरा दिक्षित ४. गार्गी कुलकर्णी 5. आर्या पालकर ६. दुर्वा पटणे
अंडर १६ (मुली)
१. गार्गी देशमाने २. शमिका उभे ३. अर्णवी नाईक ४. सौम्या मुळे 5. जानकी साधळे ६. अन्वी हुल्ले