spot_img
spot_img
spot_img

शबनम न्यूज च्या वर्धापनदिनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव

नववा वर्धापन दिन सोहळा विशेषांकाचे प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील शबनम न्यूज या वृत्तसंस्थेचा नववा वर्धापन दिन निमित्त शनिवारी अभूतपूर्व उत्साहात स्नेह मेळावा संपन्न झाला. शहरातील राजकीय, सामाजिक, प्रशासन, शैक्षणिक, सहकार, व्यावसायिक, सांस्कृतिक, नाट्य, पर्यावरण, क्रीडा, न्यायपालिका,पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्नेह मेळाव्यास हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.शबनम न्यूज च्या संपादिका शबनम सय्यद यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

शहरातील तापकीर चौक येथील कुणाल हॉटेल येथे आयोजित या स्नेह मेळाव्याच्या प्रारंभी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे शहराध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून नऊ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला.

शबनम न्यूज च्या ९ व्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेह मेळाव्यात कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली, पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना फिरोज मुजावर यांनी गणेश वंदना सादर करत उपस्थितांची मने जिंकली.याचबरोबर कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी फिरोज मुजावर यांनी उत्कृष्ट दर्जेदार लावणी सादर केली.

यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद, कवयत्री कमल सोनजे, शिवसेनेच्या रूपालीताई आल्हाट, भाजपच्या कविता ताई कडू पाटील, राष्ट्रवादी मॅनेजमेंट सेलचे अकबर भाई मुल्ला, महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष प्रदीप आहेर, मराठी साहित्य परिषदेचे राजन लाखे, सामाजिक कार्यकर्त्या विजया मानमोडे, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, एडवोकेट दीपक साबळे व त्यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते साहूल हमीद शेख, संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष संदेश बोर्डे, काँग्रेसचे युवा नेते गौरव चौधरी, मुजफ्फर इनामदार, डॉक्टर मनीषा गरुड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मयूर जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर, वृत्तपत्र विक्रेते अनिल दळवी, लोकमत सखी मंचच्या दिपाली भोईर, सामाजिक कार्यकर्त्या पुनम म्हस्के व संतोष म्हस्के, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, राष्ट्रवादीच्या भक्ती कुरकुट, आर पी आय आठवले गटाचे अजिज भाई शेख व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बचत गट सेलच्या पेक्षा ज्योतीताई गोफणे, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस रमजान सय्यद, शिवसेनेच्या अनिता तुतारे व त्यांचे सहकारी, अवकारिका चित्रपटाची अभिनेत्री स्नेहा बालपांडे, शिवसेना ठाकरे गटाचे युवक शहर उपप्रमुख निखिल दळवी, माजी स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे व सोनाली गाडे, स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे व त्यांचे सहकारी, काँग्रेस पक्षाचे विठ्ठल मारुती शिंदे, लेखिका कवयित्री अंजू सोनवणे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक आर्यन, भाजपचे सचिन साठे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष फजल भाई शेख, रशीद सय्यद, रफिक कुरेशी, रमजान मामू, माजी नगरसेविका मनिषा ताई पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार, शिवसेना शिंदे गटाच्या महिला शहरप्रमुख सरिता ताई साने व त्यांचे सहकारी, तसेच पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, डिजिटल मीडियाचे शहराध्यक्ष सुरज साळवे, उपाध्यक्ष शिवाजीराव गोडे, न्यूज पीसीएमसी चे पत्रकार संतोष जराड, वृत्त शक्तीचे संपादक जितेंद्र गवळी, डिजिटल पीसीएमसी चे मुकेश जाधव, प्रसाद बोरसे, देवा भालके, दिलीप देहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!