शबनम न्यूज | प्रतिनिधी
नेत्रदान पंधरवाडा निमित्त मेडिफिट फाउंडेशन पीसीएमसी सायलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरी आणि मॅरेथॉनमध्ये सुमारे चारशे डॉक्टर्स धावले.
पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौकाजवळील आगरवल आय रुग्णालय समोरून हि फेरीला प्रारंभ झाला. नाना काटे यांनी झेंडा दाखवून या फेरीला प्रारंभ केला. कोकणे चौक- रक्षक चौक-औंध रुग्णालय मार्गे औंध पुन्हा आगरवाल आय रुग्णालय अशा मार्गे हि फेरी काढण्यात आली. ५ किमी, १० किमी, आणि २१ किमी अशा तीन गटात धावले. तर २१ किमी सायकलोथॉनमध्ये धावले.
नेत्रतज्ज्ञ खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी विशेष भेट देवून सर्वांना नेत्रदानाची शपथ दिली.
यावेळी जिल्हा नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, मेडिफिट फाउंडेशन अध्यक्ष
डॉ. विवेक बोंडे,पीसीएमसी सायकलिस्ट अध्यक्ष
डॉ. धनराज हेळंबे,सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप ननावरे,पिंपळे सौदागर- वाकड-रहाटणी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. गोविंदराम खन्ना, फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजित पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पुना ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ तेजस्विनी वळिंबे,महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ शिरीष थोरात,पुणे ऑपथॅमिक सोसायटीचे जयेश पाटील,डॉ आग्रवाल आय हॉस्पिटलचे संचालक डॉ.बबन डोळस, डॉ पद्मनाभ केसकर,डॉ अनिकेत अमृतकर आदी उपस्थित होते.
मुख्य आयोजक डॉ डोळस यांनी यावेळी नेत्रदान करण्याचे आवाहन केले. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी डॉ आग्रवाल आय रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले.