spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हलमध्ये रंगला ऑल इंडिया मुशायरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विज्ञान, उद्योग व तंत्रज्ञानासोबतच भाषेच्या आधारेच “मानवी सभ्यता” घडली आहे. भाषा ही ओळख निर्माण करते, संस्कृतीला जोपासते आणि काव्य हे परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे.” पुणे फेस्टिव्हल सारख्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवात मुशायराच्या माध्यमातून एकोपा जोपासला जातो हे मी खूप महत्वाचे मानते असे उदगार राज्यसभेच्या खासदार व महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या सदस्या डॉ. फौजिया खान यांनी काढले. ३७व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये आयोजित ऑल इंडिया मुशायराचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. रात्री उशिरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती.

एम. सी. ई. सोसायटीच्या डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये ऑल इंडिया मुशायरा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. गेल्या ३७ वर्षांपासून सलगपणे साजरा होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डॉ. पी. ए. इनामदार आणि सौ. आबिदा इनामदार यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. उर्दू मुशायरा हा या फेस्टिव्हलचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सतीश देसाई हे या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा व परस्पर प्रेमाचा संदेश देणे हा आहे. यामुळे पुणे शहरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम राखले गेले आहे. गेली २७ वर्ष आम्ही या मुशायराचे आयोजन करीत आहोत असे ऑल इंडिया मुशायराच्या निमंत्रक सौ. आबिदा इनामदार यांनी सांगितले.
देशभरातील नामवंत शायरांनी या मुशायऱ्यात आपली गझल व कविता सादर करून रंगत आणली. हा मुशायरा न्यूज 24 चॅनेल, तसेच आझम कॅम्पसच्या फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूबवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला. मुख्य अतिथी डॉ. फौजिया खान यांची ओळख श्री. अब्दुल हमीद इनामदार (विश्वस्त, हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्ट) यांनी करून दिली.

ऑल इंडिया मुशायरात गोविंद गुलशन (गाझियाबाद), इरशाद अंजुम (मालेगाव), आरिफ सैफी (हैदराबाद), निकहत अमरोही (अमरोहा), सज्जाद झंझट (उत्तराखंड), मेहक कैरान्वी (हैदराबाद), जुबेर अली ताबिश (जळगाव), डॉ. इफ्तेखार शकील (रायचूर), अब्बास कमर (दिल्ली), कलीम जावेद (उत्तर प्रदेश) आणि स्थानिक शायर हिसामुद्दीन शोला (पुणे) आदींचा समावेश होता.
डॉ. इफ्तेखार शकील यांनी डॉ. पी. ए. इनामदार यांच्या सन्मानार्थ एक विशेष कविता सादर केली.

मुशायऱ्याचा समारोप मनमोहक शायरीने झाला.
“जंगल से न दुनिया में किसी टापू से आये हैं
ज़मीन की गोद में हम अर्श की पहलू से आये हैं
हमें रोज़ी तो हिन्दी और अंग्रेज़ी ने दी बेशक!
मगर आदाब जीने के हमें उर्दू से आये हैं”

“जिस तरह चाँद सितारों में नज़र आता है
मेरा महबूब हज़ारों में नज़र आता है
सब में होता नहीं क़ुर्बानी का जज़्बा
ये तो बस इश्क़ के मारों से नज़र आता है ”

“जो हलाल रिज़्क है वो निवाले चूम लो
छोड़ दो सारे अंधेरे उजाले चूम लो
कर रहे हैं आप के राहों को रोशन ये चराग़
जाओ अपने बाप के हाथों को चूम लो
सौदा पुरानी ज़िन्दगी का आसान कर दिया
जो बिक नहीं रहा था उसे दान कर दिया
पूरी ग़ज़ल का लुत्फ़ उठा ही नहीं सके
मतले ने इस क़दर हमें हैरान कर दिया”

डॉ. मोहम्मद सलीम अब्दुर्रहमान लाहोरी (कुलगुरू, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ) यांनी शायरांचा सन्मान करून त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अजमत दलाल यांनी पुणे फेस्टिव्हलमधील ऑल इंडिया मुशायराचे संयोजक डॉ. पी. ए. इनामदार आणि निमंत्रक सौ. आबिदा इनामदार, कृष्णकुमार गोयल, ॲड. अभय छाजेड, रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई यांचे आभार मानले. तसेच आझम कॅम्पसचे शिक्षकवृंद, तांत्रिक सहकारी आणि सर्व आयोजकांचे विशेष कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!