spot_img
spot_img
spot_img

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरत रविवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता त्यांचे मीरा रोड येथील राहत्या घरी निधन झाले.

अभिनेत्री प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ आदी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्या शेवटच्या झळकल्या आहेत. तसेच ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!