शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील साई साहेब सोसायटीत मा.विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. पिंपळे सौदागर मधील सोसायट्या पैकी साई साहेब सोसायटी एक आहे. येथे जवळपास १३२ सदनिका आहेत या सोलर इनर्जी नार्फ ६० kv वीज निर्मीत केली जाणार असून त्यामुळे सोसायटीला येणाऱ्या महावितरणच्या बिलामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होऊन रहिवाश्यांची आर्थिक बचत होणार आहे. हे सोलर सिस्टीम बसविण्याचे काम सोलारटेक या कंपनीमार्फत करण्यात आले. यावेळी साई साहेब सोसायटीचे कमिटी मेम्बर श्रेयश बेल्लारी, शिवराम लटपटे, प्रितम पाटील, आतम मताई , स्मिता लाढे, चेतन विसल, अमित बुटले, आमोल पाटील, व सोसायटीचे सदस्य रहिवासी उपस्थित होते.
