spot_img
spot_img
spot_img

विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहण्यासाठी ग्रंथ हे उत्कृष्ट माध्यम – विदुषी धनश्री लेले

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विचारांचा पुढचा टप्पा म्हणजे विवेक होय. प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य, अयोग्य याची परिभाषा बदलत असते. त्यामुळे प्रत्येक घटनेत प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. म्हणजेच विचारांची पुढची पायरी ही विवेक आहे. हा विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ हे उत्कृष्ट माध्यम आहे, असे विदुषी धनश्री लेले यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लेले यांच्या हस्ते अध्याय पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘वन्हि तो चेतवावा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी,प्रकाशक अनिल आठलेकर, सज्जनगड संस्थानचे अजेय बुवा रामदासी, समर्थ भारत अभियानाचे डॉ. राजीव नगरकर, ज्ञानप्रबोधिनीच्या शीतल कापशीकर, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले, पीसीईटी मीडिया अँड ब्रँडिंग डिपार्टमेंट हेड डॉ. केतन देसले यांच्यासह क्रांतिकारकांच्या वेशात आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि रेडिओचा श्रोत्रुवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथनिर्मिती मध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, संस्कृत, मराठी व हिंदी भाषेतील भारताच्या ५२ गौरव गीतांचं संकलन आणि त्यांचं चारुदत्त आफळे, श्री गोविंद देवगिरी महाराज, कै. स्वर्णलता भिशीकर, विश्वासबुवा कुलकर्णी, डॉ. मुक्ता गरसोळे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, राहुल सोलापूरकर यांच्यासह इतर १८ नामवंतांनी केलेलं विवेचन या ग्रंथामध्ये समाविष्ट केले आहे अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.
आयोजनात पीसीसीओई आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!